मन उंच उडे आकाशी
मन उंच उडे आकाशी
बोट लावुनिये नभाशी
मी आहे अजुनी धर्तीवर
मना तू आता काहीतरी कर.
बघ इथे फक्त स्वप्नांची नगरी
राख होते सकाळी सगळी
उजेड इथे इमारतीतच येतो
गरीब इथे रोजच मरतो.
फुलांचा इथे गंध नसतो
मातीलाही इथे रंग नसतो
मोलभाव होतो इथे इमानाचा
खून होतो इथे नात्याचा
जा कुठेतरी उडत जा
जिथे असेल माणुसकी
नात्या पलिकडचे नाते असेल
असेल तिथे जाणीवकी
-: नितिन कुमार :-
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें